Breking News
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त; पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजनमाहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कारबारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्णअखेर नीलेश चव्हाणला पोलिसांच्या ताब्यातऑनलाईन टास्क पडले ४४ लाखांना, तरूणीला गंडाड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारीएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनबारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्णगांजा विक्री करणारा तस्कर गजाआडपुण्यात विवाहितेचा छळ प्रकरणात ३ गुन्हे दाखल

शस्त्राच्या धाकाने तरूणाला लुटले, वानवडीतील घटना

आरोपी स्वारगेट पोलीस कॉलनीमध्ये राहायला

marathinews24.com

पुणे – तरूणाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत त्याच्याकडील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना २७ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वानवडीतील भैरोबानाला परिसरातील एएफएमसी बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी स्वारगेट पोलीस कॉलनीमध्ये राहणार्‍या रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. किसन सुरेश नुया (वय ३२, रा. स्वारगेट पोलीस कॉलनी आउट हाउस) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलचंद राठोड (वय ३७, रा. वारजे माळवाडी ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

तरूणाला शेअर मार्केटचे आमिष पडले २६ लाखांना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राठोड वारजे माळवाडीत राहायला असून, २७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास एएफएमसी बसस्थानक परिसरात थांबले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपी किसन नुया याने त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. मला पैसे दे नाहीतर तुला मी मारून टाकेल, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर आरोपीने राठोडला मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या खिशातील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top