Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

फुरसुंगीत चाकूच्या धाकाने तरुणाला लुटले, आरोपीला अटक

शेतजमिनीतील रस्त्याच्या वादातून भावंडांवर हल्ला

दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूचा धाक; तरुणाकडून ७०० लुटले

marathinews24.com

पुणे – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ओळखीतील एकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील ७०० रूपये लुटणार्‍याला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २४ ऑगस्टला सकाळी साडेनउच्या सुमारास हांडेवाडी ता. हवेली या ठिकाणी घडली. मतीन नासिर शेख (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगीत राहणार्‍याने तक्रार दाखल केली आहे.

खुनी हल्लेखोरांना पाठलाग करुन पकडले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फुरसुंगीत राहायला असून, आरोपी मतीन शेख हा त्याच्या ओळखीतील आहे. २४ ऑगस्टला सकाळी सव्वा नउच्या सुमारास मतीनने तक्रारदाराला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, त्याने आरोपीला पैसे देण्यास नकार दिला. त्याच रागातून आरोपी मतीने चाकूचा धाक दाखवून तक्रारदाराच्या खिशातील ७०० रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पथकाने तत्काळ मतीन शेख याला अटक केली. याप्रकरणी उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे तपास करीत आहेत.

सायबर चोरट्याने घातला १२ लाखांचा गंडा

ईसीआय (इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया) कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने ७७ वर्षीय जेष्ठाला तब्बल १२ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १२ फेबु्रवारी २०२६ रोजी कोथरुडमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक वापरकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरुडमध्ये राहायला असून, १२ फेबु्रवारीला सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर टेक्स्ट मेसेज पाठवला. इलेक्शन कमीशन ऑफ इंडियामधून ऑफिसर बोलत असल्याचे सांगून, मतदार नोंदणी फॉर्ममध्ये वडिलांच्या नावामध्ये घोळ असल्याची बतावणी केली. एक फॉर्म पाठवतो तो भरून द्या असे सांगितले. त्यानंतर रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन चार्जेस म्हणून ५ रुपये भरण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाच्या डेबिट कार्डचे सर्व डिटेल्स घेउन ज्येष्ठाच्या खात्यातून ११ लाख ९७ हजार ७८२ रुपये ऑनलाईनरित्या काढून घेत त्यांची फसवणूक केली. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील कारोटे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×