Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणाला लुटले

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एटीेएममधून पैसे काढणाऱ्या तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील २८ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावरील वीर चापेकर चौकात घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केजच्या बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय तरुण कसबा पेठेत राहायला आहे. १ जानेवारी रोजी तरुण आणि त्याचा मित्र गणेशखिंड रस्त्यावरील वीर चापेकर चौकातील श्री म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या एटीएममधून रात्री साडेनऊच्या सुमारास रोकड काढून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. दोघांनी शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. झटापटीत तरुणाच्या खिशातील २८ हजार रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक पांढरे तपास करत आहेत.

नगर रस्त्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणाला पुणे स्टेशनपर्यंत सोडण्याची बतावणी करुन मोटारचालक आणि साथीदारांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली हाेती. शहरात पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील रोकड, तसेच मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याचे प्रकार वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×