Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पोहण्यासाठी गेलेला तरूण बुडाला, ३ दिवसांनी मृतदेह आढळला

अग्निशमक दलाच्या जवानांनी शोधला मृतदेह

marathinews24.com

पुणे – पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताडीवाला रोड परिसरातील नदीपात्रमध्ये घडली. ३ दिवसांनी तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. ही घटना शनिवारी (दि. ३०) ताडीवाला रोड परिसरात संध्याकाळी घडली होती. राहुल सूर्यकांत हावडे (वय २४ ) असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे.

पुण्यात सिमेंट मिक्सर वाहनाने दोघा दुचाकीस्वारांना चिरडले – सविस्तर बातमी

अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल हावडे हा तरुण शनिवारी (दि.३१) ताडीवाला रोड परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, वाहत्या पाण्यात तो बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. त्यानुसार नायडू अग्निशामक केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाल. नदीपात्रामध्ये बोटीच्या साह्याने शोध मागील तीन दिवस शोधमोहिम राबविण्यात आली. अग्निशमक दल केंद्रातील जवानांसह ड्रायव्हरांनी ताडीवाला रोड ते मांजरी बंधार्‍यापर्यंत शोध घेतला. सहायक विभागीय अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ भगवान वायकर निलेश लोणकर, दत्तात्रेय सातव, सर्व तांडेल ड्रायव्हर फायरमन यांनी तीन दिवस अहोरात्र प्रयत्न केले. मुंढवा ब्रिजखाली सोमवारी( दि.१) सायंकाळी पाच वाजता हावडेचा मृतदेह मिळून आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×