Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

पुण्यात प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी तरुणीचा मृत्यू

चंदननगर पोलीस

अटकेत असलेल्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. तरुणीवर गेल्या दहा दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अमित लुंकडसह ३० ते ४० जणांवर गुन्हा – सविस्तर बातमी

उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे उपचारादरम्यान मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर दिलीप राठोड (वय २२, रा. हिंगोली) याला अटक करण्यात आली. याबाबत उजालादेवीचा भाऊ भगतसिंग (वय २५) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी राठोडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.

उजालादेवी आणि आरोपी राठोड हे विमाननगरमधील एका माॅलमध्ये काम करत होते. काम करताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. २९ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी राठोड हा चंदननगरमधील पठारे वस्ती परिसरात आला. उजालादेवीचा भाऊ आणि वहिनी हे कामावर गेले होते. राठोड तरुणीच्या घरात शिरला. त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. राठोडने तिचा गळा ब्लेडने चिरला अणि तेथून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या उजालादेवीला तातडीने रहिवासी आणि पोलिसांनी सुरुवातीला ससून रुग्णालयात दाखल केले. तिने भावाला या घटनेची माहिती दिली.
उजालादेवी गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने खासगी रूग्णलयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी (८ मे) तिचा मृत्यू झाला. पसार झालेल्या आरोपी राठोडला पोलिसांनी हिंगोली परिसरातून अटक केली.

उजालादेवीने विवाहास नकार दिला होता. तिचा विवाह ठरला होता. तेव्हापासून राठोड तिच्यावर चिडला होता. त्यांच्यात वाद व्हायचे. वादातून त्याने तिचा ब्लेडने गळा चिरला, अशी माहिती तपासात मिळाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×