Breking News
हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत भरदिवसा घरफोडीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अपुरी कामे तातडीने पूर्ण करावीतपतीच्या अनैतिक संबंधामुळे महिलेची आत्महत्यापुण्यात तरुणाकडून १० लाखांचा गांजा जप्तMonsoon Update : महाराष्ट्रात मान्सून का लांबणीवर जातोय…कधी होणार मान्सूनला सुरवात?असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही- प्रा मिलिंद जोशीपुण्यात सायबर चोरट्यांकडून ६ कोटी २५ लाखांची फसवणूकब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरीलाफ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी

रूग्णालयय बॉम्‍ब प्रकरणात आरोपीला 22 मेपर्यंत पोलिस कोठडी

उषाकिरण हॉस्पिटल बॉम्ब प्रकरण

marathinews24.con

पुणे – शहरातील हडपसर येथील रुग्णालयात बॉम्‍बसदृश्य वस्‍तू ठेवल्‍याचा बनाव उघड झाल्‍यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएसने) आरोपीला नागपूर ताब्यात शनिवारी पहाटे पुण्यात आणले. त्‍याला अटक करून सकाळी साडे आठ वाजता लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्‍याला 22 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवाजी राम राठोड (वय २९, जून सोलापूर मांजरी) असे पोलिस कोठडी सुनाविन्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले – सविस्तर बातमी

हडपसर भागातील कामधेनू इस्‍टेटच्‍या मागील बाजूला असणाऱ्या उषाकिरण हॉस्पीटलच्‍या पहिल्या मजल्यावरील शौचालयात बुधवारी सायंकाळी बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली होती. यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. तसेच बॉम्बशोधक पथकाने ही बॉम्ब सदृश्या वस्‍तू निकामी केली होती. दरम्‍यान त्‍याला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी अभियोक्‍ता कविता कांबळे यांनी त्‍याच्‍या पोलिस कोठडीची मागणी केली. त्‍याने बॉम्‍ब बनविण्यासाठी जिलेटीन कांड्या, टाईमर मशीन कोठून आणले. त्‍याला बॉम्‍ब बनविण्याचे प्रशिक्षण कोणी दिले, आरोपीने बॉम्‍ब तयार करण्यासाठी त्‍यामध्ये वापरलेली स्फोटके व इतर रासायनिक पदार्थ कोठून व कशाप्रकारे मिळविला, बॉम्‍ब उषाकिरण हॉस्पीटलमध्येच का लावला, त्‍याने बॉम्‍ब कोणत्‍या ठिकाणी तयार केला अशा विविध मुद्यांचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी कांबळे यांच्‍यावतीने करण्यात आली. त्‍याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×