Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले

विमानतळ पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी लुटणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍या कडून 1 लाख 65 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रणय अमर बुवा (वय 19, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. ही घटना 11 मे रोजी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पुण्यात ड्रग्जचा साठा जप्त; राजस्थानातील दोघांना बेड्या – सविस्तर बातमी

तक्रारदार तरुणासह त्यांचा मामेभाऊ यांना आरोपी व त्याच्या साथीदारांनी विमाननगर परिसरातील झिरकॉन सोसायटीजवळ बोलावले. त्यानंतर जबर मारहाण करून त्यांच्याकडील 1 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल आणि एक ॲक्टिव्हा दुचाकी हिसकावून नेली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडून 25 हजार 940 रुपयांची रोख रक्कम, 90 हजार रुपयांचा कंपनीचा मोबाईल तसेच 50 हजार रुपयांची ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण 1 लाख 65 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, पोलिस निरीक्षक महेश बोलके, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, अमंलदार लालु कऱ्हे, रूपेश पिसाळ, अकुंश जोगदंडे, राहुल जोशी, योगेश थोपटे यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×