आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेला; धनजंय देशमुखांचा आरोप

आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेला; धनजंय देशमुखांचा आरोप

पुढील सुनावणी ६ मार्चल

marathinews24.com

बीड – जिल्हातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची दि. २१ फेब्रुवारी रोजी बीड विशेष मकोका न्यायलयात सुनावणी पार पडली. देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा मागील सहा महिन्यापूर्वी तीनदा त्याच्या गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसेच त्यांनी पोलीस यंत्रणेच्या तपासावर देखील संशय व्यक्त केला आहे.२१ फेब्रुवारीला बीड येथील विशेष न्यायालयात बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

‘एपीके फाईल’ पाठवून साडेसहा लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

न्यायालयाच्या परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे म्हणाले की, संतोष देशमुख हत्याकांडातील फरार असलेला आणि तपास यंत्रणेला चकवा देत असलेला फरार आरोपी हा तीन वेळेस त्याच्या धारूर तालुक्यातील मैंदवाडी या गावात येऊन गेला आहे. या आरोपीपासून देशमुख कुटुंबियांच्या जीविताला धोका असून तो क्रूर आहे, अशी भीतीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. कृष्णा आंधळे हा मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. त्याला तत्काळ अटक करून त्याची धिंड काढण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. हे आरोपी राक्षशी प्रवृत्तीचे असून तो तीन वेळा गावी आला असल्याची माहिती त्यांनी तपास यंत्रणेला दिली असल्याची माहिती देखील दिली आहे. या प्रकारामुळे धनंजय देशमुख यांनी पोलिस यंत्रणेवर देखील संशय व्यक्त केला आहे.

तसेच त्याला समर्थन देणारे देखील तेवढेच क्रूर आणि राक्षशी प्रवृत्तीचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान धनंजय देशमुख यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे पोलिसांसह तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होत आहेत.आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्चला होणार आहे.

सरकारी वकील बदलण्याची मागणी

प्रकरणातील इतर आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. यावर सरकारी पक्ष ६ मार्च रोजी आपले लेखी म्हणणे मांडणार आहे. तसेच, आरोपी जयराम चाटे आणि प्रतीक घुले यांच्या वकिलांबाबतही कोर्टात चर्चा झाली. तांत्रिक अडचणींमुळे अडकलेला लॅपटॉपमधील डेटा आता रिकव्हर झाला असून, ६ मार्चला सर्व साक्षीदारांची यादी कोर्टात सादर केली जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×