‘एपीके फाईल’ पाठवून साडेसहा लाखांची फसवणूक

‘एपीके फाईल’ पाठवून साडेसहा लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वाहतूक नियमभंगाचे चलन, तसेच बँकेच्या नावे बनावट कागदपत्रे एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी दोघांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी आणि मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात अल्पवयीनांकडून गोळीबार; चौघे जण ताब्यात – सविस्तर बातमी 

विश्रांतवाडी भागातील एका तक्रारदाराची सायबर चोरट्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात आलेल्या कारवाईचे बनावट दंडात्मक चलन पाठवून तीन लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात तीन जानेवारी रोजी दंडात्मक कारवाईचे बनावट चलन तक्रारदाराला पाठविले होते. हे चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ६४ हजार रुपयांची रोकड स्वत:च्या खात्यात वळविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रा दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.

मुंढवा भागातील एका तरुणाला बँकेच्या नावे बनावट कागदपत्रे एपीके पाईलच्या माध्यमातून पाठवून सायबर चोरट्यांनी दोन लाख ९८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×