पुण्यात अल्पवयीनांकडून गोळीबार; चौघे जण ताब्यात

खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात

स्वारगेट पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत अल्पवयीनांनी दहशत माजविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अल्पवयीनांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज भागात डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रात्री पावणेअकराच्या सुमारास चौघे अल्पवयीन दुचाकीवरुन आले. ‘आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल’, असे सांगून अल्पवयीनांनी त्यांच्याकडील पिस्तुल उगारून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करुन अल्पवयीनांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला, तसेच अल्पवयीनांनी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखविला. या घटनेनंतर अल्पवयीन दुचाकीवरुन पसार झाले. गोेळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडने तपास सुरू केला. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×