शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
marathinews24.com
पुणे- अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे . ही घटना २०१६ मध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. खुनाच्या प्रकरणात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने आरोपी विठ्ठल बाबासाहेब गुंड (वय ३१, रा. गुंडेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) याला दोषी ठरवत जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणाचा तपास लोणी काळभोर पोलिसांनी केला होता.
२२ मोबाइल, ६ दुचाकी चोरणार्याला अटक, अल्पवयीन ताब्यात, खडकी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
आरोपीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेला बाळकृष्ण (वय १६) हा एका कुटुंबाचा उमदा तरुण होता. न्यायालयाने यावेळी नमूद केले की, मृतकाच्या पालकांच्या दुःखाला भरपाई शक्य नाही, परंतु त्यांच्या भविष्यासाठी DLSA मार्फत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे संबंधित कुटुंबातील नागरिकांनी आनंद साजरा केला. पोलीस उपायुक्त कार्यलयात येऊन डॉ राजकुमार शिंदे यांच्यासह सरकारी वकिलांचे आभार मानले.
यातील १६ साक्षीदार यांची साक्ष सकारात्मक झाली होती, गुन्ह्यात लाकडी दांडके आणि स्टील चे कटर होते त्यामुळे साहेब किती शिक्षा देतात त्याची भीती होती, पण निकाल खूप छान झाला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा निकाल दिला आहे.अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांच्या युक्तिवादामुळे आरोपीस कलम 302 अंतर्गत जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, कलम 307 अंतर्गत 10 वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंड, तसेच कलम 452 अंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरी व एक रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तपास अधिकारी रणजितसिंग परदेशी (सध्या सायबर विभाग, मुंबई) यांनी केलेल्या तपासाअंती याप्रकरणात १६ साक्षीदार तपासण्यात आले. हवालदार ललिता कानवडे यांनी कोर्ट पेरवीचे काम पार पाडले. प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कामकाज पाहिले.