Breking News
पुण्यातील पोलिस हवालदार गणेश जगतापला आंध्रप्रदेशातून अटकबाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्नपुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणारपरीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवातदिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेचवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाईधर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्धमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रशासन सज्ज-वैभव नावडकर

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रशासन सज्ज-वैभव नावडकर

७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रवारी रोजी मतमोजणी; पात्र मतदारांना मतदान करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

marathinews24.com

बारामती – बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे ९ फेब्रवारी रोजी मतमोजणी होणार असून याकरिता प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडीतील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता – सविस्तर बातमी 

जिल्हा परिषद ३१; पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ अंतर्गत तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत १२ पंचायत समिती गणांकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची १६ जानेवारी २०२६ रोजी सूचना प्रसिद्ध केली. उमेदवारांडून नामनिर्देशनपत्र १६ ते २१ जानेवारी या कालावधीमध्ये स्विकारण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी करुन २२ जानेवारी रोजी निर्णय देण्यात आले. २७ जानेवारी रोजी उमेदवारी माघारी घेण्यात आली. जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबुत ६ आणि निरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार तसेच सुपा २, का-हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, निरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

निवडणुकीत २ लाख ६४ हजाराहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

निवडणूक कामकाजाच्याअनुषंगाने २५ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी, ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ६ भरारी पथकामध्ये १८ आणि ८ स्थिर निरीक्षण पथकामध्ये २४ तसेच १२ व्हिडीओ निरीक्षण पथकामध्ये ३६ तसेच २ व्हिडीओ व्हिंविंग पथकामध्ये ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता एकूण १ हजार ९४५ अधिकारी, कर्मचारी तथा शिक्षकगण नियुक्त करण्यात आलेले आहेत. निवडणूक घोषित झालेल्या क्षेत्राची लोकसंख्या ३ लाख १६४ असून त्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२ इतकी आहे.

एकूण २९९ केंद्र

बारामती तालुक्यात २९९ केंद्र आहेत. याअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे महिला मतदान केंद्र तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटफळ येथे आदर्श मतदान केंद्र असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोर्लेवाडी, गंगुबाई काटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथे ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीकरिता कंट्रोल युनिट (सीयू) २९९, बॅलेट युनिट (बीयू) ३४५ याव्यतिरिक्त सीयू ६० आणि बीयू १२० राखीव ठेवण्यात येणार आहे. टपाली मतदानाकरिता ७४३ अर्ज प्राप्त झाले असून आज अखेर ३१३ मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे.

मतदारांकरिता मतदार केंद्रावर सुविधा

प्रत्येक केंद्रावर स्वच्छतागृह, पाळणा, व्हीलचेअर, रॅम्प, वैद्यकीय सुविधा, पोलीस संरक्षण, अग्निशामक, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित तसेच प्रसारमाध्यमातून मतदान करण्याबाबत प्रसिध्दी देण्यात आली आहे. विजयी उमेदवारांची नावे १० फेब्रुवारी २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या येणाऱ्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×