Breking News
Pune Police Action Against Criminals : पुणे पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाईAkshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त

‘महाविस्तार AI’ ॲपवरील सेवांचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांचे आवाहन

marathinews24.com

बारामती – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘महाविस्तार AI’ मोबाईल ॲपवरील कृषी विषयक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.

युसीआय मानकांनुसार पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग स्पर्धेची सुरक्षात्मक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

मोबाईलवरील ‘महाविस्तार AI’ हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल सहाय्यक म्हणून काम करते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या ॲपमुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रश्नांची जलद, अचूक आणि मराठी भाषेत माहिती मिळते. हवामान अंदाज, बाजारभाव, पिक व्यवस्थापन, रोग-कीड निदान, सरकारी योजना अशा अनेक महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

AI चॅटबॉटमुळे शेतकरी मराठीत प्रश्न विचारू शकतात (मजकूर, आवाज स्वरूपात), तत्काळ वैज्ञानिक व विश्वसनीय सल्ला मिळतो. रिअल-टाइम हवामान अंदाज व पेरणी, सिंचन, काढणी यासाठी तंतोतंत माहिती मिळते.

राज्यातील विविध बाजारभावांचे माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी योग्य वेळ निवडण्यास मदत होते. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, संरक्षण उपायाबाबत मार्गदर्शन व सल्लाही मिळतो.

पिकाचा फोटो अपलोड केल्यानंतर रोग, कीड, पोषण अभावाबाबत माहिती तसेच त्यानुसार उपाययोजना शेतकऱ्यांना सूचविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अनुदान, विमा, कृषी विभागाच्या योजनांचे संपूर्ण शासकीय योजनांची माहिती मिळते. शेतीविषयक मार्गदर्शक व्हिडिओ मराठीत माहितीपूर्ण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी, प्रगतशील शेतकरी व तज्ज्ञांशी संवादाची सोय देखील उपलब्ध आहे.

‘महाविस्तार AI’ ॲप डाउनलोड करण्याकरिता
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai या लिंकवर क्लिक करावे, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा, अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन हाके यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×