Breking News
बनावट कागदत्रांद्वारे शस्त्र परवाना, हगवणे बंधूंवर गुन्हाराष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या मुलासह व्याहीविरूद्ध गुन्हा दाखलरास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येचताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणीसफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणीडी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजीनीलेश चव्हाण याला पकडल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोनमुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावावाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी

पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाई

पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाई

वाहतूक नियमनासाठी विशेष प्राधान्य – पोलीस आयुक्त अमितेशकुमार

marathinews24.com

पुणे – शहरातील बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी आता टेक्नोसॅव्ही मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार थेट आर्टिफिशल इंटेलिजन्स (ए आय) कॅमेऱ्याद्वारे दंडात्मक कारवाई करीत नियमभंग करणाऱ्या चालकांना धडा शिकवला जात आहे. वर्दळीच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर हॉटेल वैशालीनजीक ए आय कॅमेरे संचलित बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा शुभारंभ पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, एसीपी विवेक पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर उपस्थित होत्या. पहिल्याच दिवशी अवघ्या तीन तासात १८० बेशिस्त चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

श्री क्षेत्र जोतिबा मंदिराला (कोल्हापूर) सर्वसमावेशक विकास आराखडा प्रशासकीय मान्यता – सविस्तर बातमी 

शहरातील वाहतुक सुधारणासाठी नाविन्यपुर्ण बदलासह अत्याधुनिक मोहिमेची अंमलबजावणी वाहतूक विभागाकडून केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर वाहतुक शाखेने सुरू केला असून, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ए आय कॅमेऱ्याच्या माध्यमातून नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या डबल पार्किंगसह इतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पुणे शहरात प्रायोगिक तत्वावर चाचणी स्वरुपात याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाई

आगामी काही दिवसात टिळक रस्ता, जंगली महाराज रोड, शिवाजी रोड, महात्मा गांधी रस्ता, यासह महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी आर्टिफिशल इंटेलिजन्स कॅमेरे बसवून बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

पुणे वाहतूक विभाग आणि सेनसेन ए आय कंपनीचे विजय खुस्पे यांच्या संयुक्त विद्यमानाने “ए. आय. आधारीत वाहतुक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून नो पार्किंग ठिकाणी लावलेली वाहने, ३ मिनिटापेक्षा जास्त मुख्य रस्त्यावरती अडथळा करीत असल्यास कॅमेऱ्यात टिपली जात आहेत. त्यानंतर संबंधित प्रणालीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. संबंधित चालकांवर वाहतुक शाखेच्यावतीने सीसीटीव्ही चलन अपलोड केले जात आहे. त्यासोबत नियमभंग करणाऱ्या वाहनांची नंबरप्लेट पडताळणी करीत कारवाई केली जात आहे.

वाहतुक नियमभंग केला असल्यास याची पडताळणी तात्काळ केली जात असून, वाहन चालकास सिस्टिमची माहिती व्हावी म्हणून फर्ग्युसन कॉलेज रोडवरती स्क्रीनच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक नियमनाबरोबर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, भविष्यात पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणासह महत्वाच्या रस्त्यावर “ए. आय.आधारीत वाहतुक उल्लघन शोध व अंमलबजावणी प्रणालीचा वापर केला जाणार आहे. तसेच पहिल्याच दिवशी तब्बल १८० बेशिस्त वाहन चालकांना कारवाईचा दणका दिला असून, त्यापैकी काही जणांकडून दंडवसुली करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेने केले आहे.

आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे बेशिस्त वाहन चालकांना कॅमेऱ्यात टिपून दंडात्मक कारवाईचा शुभारंभ केला आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासह मध्यवर्ती फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, महात्मा गांधी रस्त्यासह विविध ठिकाणे आदर्शवत करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नागरिकांचे मोठे सहकार्य अपेक्षित असून, वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top