Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

साताऱ्याच्या ६ जणांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – राजमा बियाणे पुरवठा करण्याच्या नावाखाली अंबाजोगाई येथील बियाणे व्यापाऱ्याची १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात साताऱ्यातील ‘येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेत – सविस्तर बातमी

संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारीका सोमनाथ शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप आणि बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

अंबाजोगाई येथील सुयश प्रेमचंद मुथा (रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई) हे बियाणे व्यवसायाचे काम पाहतात. जुलै २०२५ मध्ये साताऱ्याच्या ‘येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’चे संचालक संजय बाबासाहेब भगत आणि ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेऊन त्यांना राजमा बियाण्याचे उच्च दर्जाचे नमुने दाखवले होते. त्यानुसार मुथा यांनी २१ जुलै २०२५ रोजी एकूण ८५ टन राजमा खरेदीचा करार केला. आरटीजीएसद्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. करारानुसार ठरलेला माल तपासण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, तिथे दाखवल्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध नव्हता. तडजोड म्हणून त्यांनी २५ टनाची नवीन ऑर्डर दिली आणि एकूण २६ लाख ३१ हजार रुपये जमा केले. मात्र, आरोपींनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी केवळ १२ टन माल पाठवला, जो
अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. त्यामध्ये भेसळ, माती आणि पेरणीसाठी अयोग्य साहित्य मोठ्या प्रमाणात होते. उर्वरित मालासाठी किंवा पैसे परत मिळवण्यासाठी मुथा यांनी वारंवार संपर्क केला असता, आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुयश मुथा यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×