लष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेत

सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – लष्करी अभियांत्रिकी कार्यालयात खडकीतील (एमईएस) दोन अभियंत्याविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय-एसीबी) २ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपींचे कार्यालय आणि निवासस्थानाची झडती घेण्यात आली. तेथून १ लाख ८८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

डीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू – सविस्तर बातमी

सहायक गॅरिसन अभियंता सुनील निकम, कनिष्ठ अभियंता सुरेश म्हस्के अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार एका खासगी कंपनीचा संचालक आहे. लष्करी अभियांत्रिकी कार्यालयाकडून देण्यात आलेले कामे ही कंपनी करते. काम पूर्ण झाल्यानंतर सहायक अभियंता निकम, म्हस्के यांच्याकडे बिल सादर करण्यात आले होते. बिल मंजूर करण्यासाठी सहा लाख रुपयांची लाच रुपयांची लाच मागितली. तडजोडीत तक्रारदाराने पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सापळा लावून निकम आणि म्हस्के यांना सीबीआयच्या पथकाने पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. सीबीआयच्या पथकाने त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानाची झडती घेतली. त्यांच्याकडून एक लाख ८८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×