डीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मित्रमंडळ चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – महावितरणच्या डीपी बॉक्सचे कुलूप तोडून वाहिनीला हात लावल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मित्रमंडळ चौकात घडली. या घटनेत मृत्यमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. तरुणाने कुलूप का ताेडले, यामागचे कारण समजू शकले नाही. मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हा प्रकार कैद झाला आहे.

बुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’ – सविस्तर बातमी

‘मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. त्याची ओळख पटलेली नाही. तो फिरस्ता असून, या भागातील पदपथावर राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रमंडळ चौकात महापालिकेच्या रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस पदपथावर महावितरणचा डीपी बॉक्स आहे. त्याला कुलूप लावलेले होते. शनिवरी सकाळी सातच्या सुमारास अनोळखी तरुण डीपी बाॅक्सचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने कुलूप तोडले. उच्च क्षमतेच्या वीज वााहिनाला स्पर्श झाल्यानंतर स्फोट झाला. तरुण बाजूला फेकला गेला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अनोळखी तरुणाने डीपी बाॅक्सचे कुलूप तोडून आत हात घातला. असे करण्यामागचा त्याचा उद्देश काय होता, हे समजू शकले नाही. या घटनेची चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×