Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’

बुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’

महिला पोलीस हवालदार निलंबित

marathinews24.com

पुणे – शहरातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचेा आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिले. बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली नाही, तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप महिला पोलीस हवालदारावर ठेवला आहे. पोलीस हवालदार मनिषा पुकाळे असे निलंबित करण्यात आलेल्या नाव आहे. पुकाळे फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकात नियुक्तीस आहेत. पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचे दिले आहेत.

वाहनांची तोडफोड करणारा गजाआड – सविस्तर बातमी 

शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरिुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. देशभऱात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्यानंतर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली.
बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत २०२३ मध्ये बांगलादेशी तरुणी दलालामार्फत आली होती. त्यावेळी ती अल्पवयीन होती. वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली होती. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दलाल कुंटणखाना मालकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करण्यापूर्वी बांगलादेशी तरुणी पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी भेटली होती. याबाबतची मााहिती पुकाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते. मात्र, पुकाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली नाही. त्यांनी तरुणीकडून पैसे घेतले होते.

कायद्यानुसार बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी तक्रारदार बांगलादेशी तरुणीविरुद्ध कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, पुकाळे यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवली होती. बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखळ झाल्यानंतर बांगलादेशी तरुणीची चौकशी करण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

वेश्यावस्तीत बांगलादेशी तरुणी तक्रारदार बांगलादेशी तरुणी १५ वर्षांची असताना तिला २०२३ मध्ये दलालाने तिला सीमा पार करुन कोलकात्यात आणले. तेथे काही दिवस तिला ठेवण्यात आले. त्यानंतर दलालाने तिला बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील कुंटणखान्यात आणले. दलालाने कुंटणखाना मालकिणीकडे तिला सोपविले. पाच लाख रुपयांना विकत घेतले आहे. ‘दहा लाख रुपये दिल्याशिवाय कुंटणखान्यातून सोडणार नाही’, अशी धमकी देऊन तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्यात आले. तरुणीचा छळ करण्यात आला. छळ असहय झाल्याने तिने तिच्या मित्राला या घटनेची माहिती दिली.

पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. तेव्हा तरुणी पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांच्या संपर्कात आली. अमली पदार्थ विक्रीत अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदारासह साथीदारांना नुकतीच अटक करण्यात आली. त्यानंतर महिला पोलीस हवालदाराने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करता तिच्याकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×