भारतीय कलेचा महासागर ठाण्यात उसळला

भारतीय कलेचा महासागर ठाण्यात उसळला

संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

marathinews24.com

ठाणे – मराठी भाषा, वेशभूषा, भोजन, वास्तुशैली आणि भारतीय संस्कृतीतील सौंदर्य यांचा सुरेख संगम साधणारा संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल उपवन, ठाणे येथे उत्साहात सुरू असून या महोत्सवाला विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देत कलाकार व आयोजकांचे मनापासून अभिनंदन केले.

मधु-स्मृती संगीत समारोहात भावपूर्ण सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात विविध कला प्रकारांचे सादरीकरण होत आहे. मुद्रा या व्यासपीठावर सादर झालेल्या नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून, भाषा कळत नसली तरी भावनांची एकरूपता साधणारा हा महोत्सव असल्याचे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

या वेळी बोलताना त्यांनी ठाणे हे केवळ प्रशासकीय नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही एक आगळेवेगळे केंद्र असल्याचे सांगितले. “पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते, मात्र ठाण्यालाही सांस्कृतिक राजधानी म्हणावे इतके समृद्ध काम येथे होत आहे,” असे त्या म्हणाल्या. विविध संस्थांचे सामाजिक कार्य, सेवाभाव आणि कार्यकर्त्यांची मेहनत या महोत्सवातून ठळकपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवीन महापौर मिळाल्याचा आनंद व्यक्त करत, ठाण्यातील सुविज्ञ व सुसंस्कृत नागरिकांचे दर्शन या निमित्ताने घडल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी वाढवलेल्या ठाण्याच्या गौरवात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रतापराव सरनाईक यांनी मोलाची भर घातल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. त्याचबरोबर मंत्री प्रतापराव सरनाईक व संयोजकांचे आभार मानत, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×