एनआयएची मोठी कारवाई, ३ लाखांचे होते बक्षीस
marathinews24.com
पुणे – बॉम्ब बनिवण्याचे व गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण देणार्या इसिसच्या आणखी एका दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए ) बेड्या ठोकल्या. पुणे इसिस मोड्यूल प्रकरणातील तो मुख्य आरोपी असल्याचे व त्याच्याविरूध्द विशेष एनआयए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्याच्यावर ३ लाखांचे बक्षीसही ठेवले होते. संबंधित दहशतवाद्याच्या अटकेमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. रिझवान अली ऊर्फ अबू सलमा ऊर्फ मौला असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. गुन्ह्यातील अटक केलेला तो ११ आरोपी आहे.
पिस्तूलाचा धाक दाखवून दहशत माजवणारा जेरबंद – सविस्तर बातमी
याप्रकरणात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सीमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामिल नाचन, अकीफ नाचन, शहनवाज आलम, अब्दुल्ला फैयाज शेख, तल्हा खान यांना अटक केले आहे. रिझवान अली हा इसिसच्या हिंदुस्थानमधील कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होता. वेगवेगळ्या शहरांमध्ये रेकी करून दहशतवाद्यांसाठी सुरक्षित लपण्याची ठिकाणे शोधून देत होता. गोळीबाराचे प्रशिक्षण देणे, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण, नवीन साथीदारांना प्रशिक्षण देण्याच्या जबाबदार्या त्याने पार पाडल्याचे एनआयने प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
रिझवानसह आधी अटक केलेले १० दहशतवाद्यांनी मिळून देशात धार्मिक तेढ निर्माण आणि दहशत माजवण्याचा कट रचला होता. याप्रकरणाचे आरोपपत्रही दाखल करण्यात आले असून, कोथरूड येथून तिघांना झालेल्या अटकेनंतर देशभरातुन दहशतवाद्यांची धरपकड करण्यात आली. संबंधित दहशतवादी राजस्थान येथील चित्तोरगड येथील स्फोटके बाळगल्याचा गुन्ह्यात सहभाग होते. तसेच बंदी घातलेल्या अलसुफा संघटनेशी संबंधात मोहम्मद आलम फरार झाला होता. दहशतवाद्यांकडे आईडी, पिस्तुल आणि दारूगोळा देखील सापडला होता.
ठळक घडामोडी
– फरार दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांना इम्प्रुव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आईडी) तयार करण्यासाठी पूर्व तयारी
– आरोपींच्या तपासात त्यांनी दहशवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन
– बॉम्बस्फोट केल्यानंतर अटक टाळण्याची देखील योजना त्यांनी आखली
– अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी दुर्गम जंगलात लपण्याचा प्लॅन
– जंगलात लपण्यासाठी त्यांनी ड्रोनद्वारे ती जंगलातील ठिकाणे
शोधली
– दहशतवादी कृत्यासाठी त्यांना हिंदुस्थान तसेच परदेशातून वित्तपुरवठा
– राष्ट्रीय सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहचविण्याचा उद्देश
– हिंदुस्थानच्या भुमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू
– महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यामध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी केली होती.