बाणेर परिसरात साडे पाच लाखांचा गांजा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कारवाई
Marathinews24.com
पुणे – शहरातील बाणेर परिसरात ओझोकुशची (हायड्रोफोनीक गांजा) तस्करी करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी दोनने अटक केली आहे.अर्जुन लिंगराज टोटिगर ( वय २६ वर्षे, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगांव, बाणेर) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ३ लाख ५ हजारांचा ३० ग्रॅम ५४० मिली ग्रॅम ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) इतर ऐवज जप्त केला. त्याच्याविरुध्द बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी हा मार्केटींग आणि सेल्सचा पदवीधर असून सध्या तो खाजगी कंपनीमध्ये काम करीत आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे १० एप्रिलला बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना शिवशक्ती चौक बाणेरमध्ये एकजण गांजा तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एपीआय नितीनकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.त्याच्याकडून ३ लाख ५ हजारांचा गांजा जप्त केला.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, प्रशांत बोमादंड्डी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.