Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

पुण्यात रस्त्यांवरील विद्युत खांब मृत्यूचे सापळे

कामावरुन काढून टाकल्याने एकाची आत्महत्या

वीजेच्या धक्क्याने चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागातील रस्त्यालगत असलेले काही विद्युत खांब आता मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत का, असा प्रश्न सात वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूने उपस्थित झाला आहे. ऐन पावसाळ्यात विद्युत पुरवठा करणार्‍या खांबामध्ये उतरणारा विद्युत प्रवाह सर्वसामान्यांसह लहानग्यांच्या जीवावर बेतण्याच्या स्थितीत आहे.

गुडलक चौकात धांगडधिंगा घालणाऱ्या ४० जणांवर गुन्हा दाखल, डेक्कन पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी

मित्रासोबत खेळत असलेल्या चिमुरडीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना २ जूनला नाना पेठेत घडली आहे. दुर्घटनेमत तिचा मित्र गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होत आहे.

पावसाळ्यापुर्वी प्रत्येक विभागातील विद्युत रोहित्रासह सार्वजनिक वीज व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या खांबाची तपासणी करणे महावितरणसह महापालिकेचे काम आहे. प्रत्यक्षात मात्र, वीजेचा धक्का बसून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच दोन्ही प्रशासनाला जाग आल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठलेल्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांविरूद्ध थेट मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल होणे गरजेचे आहे. विजेचा धक्का बसून ७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा अल्पवयीन मुलगा गंभीरित्या जखमी झाला.

नाना पेठेतील डोके तालीम परिसरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. सायली गणेश डांबे (वय ७) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर शिळीमकर नावाचा मुलगा जखमी झाला आहे. दरम्यान, दुर्घटना घडल्यानंतरही प्रशानाकडून जबाबदारीची टोलवा टोलवी केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विद्युत खांबाची तपासणी करताना महाविरणने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. त्यासोबतच परिसरात सार्वजनिक ठिकाणांवर विद्युत जोडणी देताना महापालिका प्रशासनानेही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात किमान एकाजणाचा मृत्यू होत असल्याचे गांभीर्य दोन्ही प्रशासनाला आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनेनंतर एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी समन्वयाने काम केल्यास एखाद्या पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकाचा जीव वाचविण्याचे काम संबंधित विभागाने करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वीजेच्या धक्क्याने दोन बालकांचा झाला होता मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा

वीजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ३० जून २०२३ मध्ये मुंढवा परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बांधकाम मजूर आणि त्याचे कुटुंबीय तेथे राहत होते. ३० जून रोजी पत्र्याच्या खोलीत वीजेच्या धक्क्याने शौर्य गणेश पोटफोडे (वय ८) आणि कान्हा गणेश पोटफोडे (वय ६) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. तपासात बांधकाम ठेकेदार धारु गणेश काळे (रा. नर्‍हे आंबेगाव) याने बेकायदा वीजजोड घेतल्याचे उघडकीस आले. वीजप्रवाह पत्र्याच्या खोलीत उतरल्याने शौर्य आणि गणेश यांचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर ठेकेदार धारु काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोंढव्यात पावसात वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पावसात आडोशाला थांबलेल्या तरुणाला तारेच्या कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जून २०२३ मध्ये कोंढवा भागात घडली होती. अजयकुमार विनोदकुमार वर्मा (वय ३०, रा. पवार चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. विनोदकुमार फेरारीराम वर्मा (वय ५०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अजयकुमार कामानिमित्त घरातून बाहेर पडला असता, अचानक पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे अजयकुमार कोंढव्यातील ब्रम्हा इस्टेट सोसायटीच्या सीमाभिंतीलगत असलेल्या तारेच्या कुंपणाजवळ थांबला. तारेच्या कुंपणात वीजप्रवाह उतरला होता. विनोदकुमार याच्या हाताचा स्पर्श तारेच्या कुंपणास झाला. कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून तो बेशुद्ध पडाला.

वीजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यूची घटना

खेळताना वीजेचा धक्क्याने १० वर्षांच्या शाळकरी मुलाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जून २०२४ मध्ये वडगाव शेरीतील गणेशनगर भागात घडली. मोहित वेदकुमार चावरा (वय १०, गल्ली क्रमांक ९, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. मोहित मित्रांसोबत घराजवळ खेळत असताना, अचानक त्याचा हात अर्थिंगच्या वायरला लागला. वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने वीजेचा धक्का मोहितला बसल्यामुळे मोहित जागेवर कोसळळा. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तो एका शाळेत चौथीत होता. चावरा कुटुंबीय मूळचे गुजरातचे असून,व्यवसायाच्यानिमित्ताने ते वडगाव शेरी भागात काही वर्षांपूर्वी स्थायिक आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×