Breking News
खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणेराज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाहीपुण्यात पालखी सोहळ्यावेळी ५ लाख वारकरी मुक्कामीअग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरूण वाचलारिक्षाच्या धडकेत पादचारी ठार, विमाननगरमध्ये घडला अपघातट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठारपालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविलेमाजी आमदाराची बनावट सही करुन ३० कोटींच्या कर्जाचे वितरणवारकरी महिलेच्या अंगावर मांस फेकले, आरोपीविरुद्ध लष्कर ठाण्यात गुन्हा दाखलडॉ. सबनीस यांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम केले – शरद पवार

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गोलेगाव रोड, शिरुर या संस्थेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभ – सविस्तर बातमी 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारिरीकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थींनींना वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहेत.

शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींनींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरमहा निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शिवाय विद्यार्थीनींकरीता ई-ग्रंथालय व सुसज्ज व्यायामशाळा आदी अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

विद्यार्थीनी बाहेरगावची परंतू शिरुर मध्ये शिक्षण घेणारी असावी. प्रवेशासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ज्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे तेथील बोनाफाईड दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड (विद्यार्थीनीचे व वडीलांचे), शिधापत्रिकेची दुय्यम प्रत सोबत आणाव्यात. वसतीगृह प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahaait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अधिक माहितीसाठी गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, गोलेगाव रोड, पुणे-नगर हायवे, शिरुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल  ए. एस. सूर्यवंशी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top