आधार संच वितरण साठी अर्ज करण्याचे आवाहन

आधार संच वितरण साठी अर्ज करण्याचे आवाहन

जाहिरातीत नमूद ठिकाणाकारीता आधार संच वितरणासाठी प्रशासनातर्फे अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुंबई यांचे कडून पुणे जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले असून जाहिरातीत नमूद ठिकाणाकारीता आधार संच वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

गणेशोत्सव म्हणजे सामाजिक ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

आधार संच जिल्ह्यातील पुढे नमुद ग्रामीण महसूल मंडळ व पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात वितरण करणेकामी पात्र “आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी” जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.pune.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, प्रस्तावित आधार केंद्राबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती डाऊनलोड करून घ्यावी.

इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० वाजल्या पासून ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तसेच १सप्टेंबर २५ रोजीची सुट्टी वगळून) जिल्हाधिकारी कार्यालय,संजय गांधी योजना शाखा’अ’ विंग, ४ था मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे येथे प्रत्यक्ष सादर करावे असेही जिल्हा प्रशासना मार्फत प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×