Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

जिल्हा युवा पुरस्कारांसाठी अर्ज मागविले; १५ जुलैपर्यंत मुदत

जिल्हा युवा पुरस्कारांसाठी अर्ज मागविले; १५ जुलैपर्यंत मुदत

१५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्याच्या युवा धोरणांतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या चार वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यासाठी युवक, युवती आणि नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. युवक कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र व्यक्ती व संस्थांनी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदीत गर्दी टाळावी; वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन – सविस्तर बातमी 

जिल्हास्तरावर दरवर्षी एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. युवक व युवती पुरस्कारामध्ये गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी १० हजार रुपये, तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक अथवा युवतीचे वय संबंधित पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे आणि ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षे असावे. अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात सलग पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. संस्था नोंदणीकृत असून किमान पाच वर्षांपासून कार्यरत असावी.

पुरस्कारासाठी ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य, युवा विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन, दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य तसेच राष्ट्र उभारणीसाठी दिलेले योगदान आदी बाबींचा विचार करण्यात येणार आहे.

अर्जासोबत केलेल्या कार्याचे सबळ पुरावे, आवश्यक कागदपत्रे तसेच मुलाखतीसाठी पीपीटी सादरीकरणाची सीडी जोडणे बंधनकारक आहे.

इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज १५ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सर्वे क्र. १९१, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूलसमोर, येरवडा, पुणे – ४११००६ येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी दादासाहेब देवकाते (९९२३९०२७७७), शिवाजी कोळी (७०२०३३०४८८), ज्योती सुयवंशी (७७९८३०२४८१) आणि अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७) यांच्याशी संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×