Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेन प्रणालीवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी- जिल्हा क्रीडा अधिकारी

marathinews24.com

पुणे – गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक व जलद आणी त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ८ जानेवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूपर्यंत पोहोचण्यासाठी शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यादृष्टीन पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

लिफ्ट देण्याच्या बतावणीने लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी 

क्रीडा संघटनेने करावयची कार्यवाही-राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी अभिलेख जतनाकरिता स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणी गुणपत्रिका विहित नमुन्यात “xlsx “ फाईल “क्रीडा ई प्रमाण” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) वर अपलोड करण्यासाठी संचालनालयास सादर करणे क्रीडा संघटनावर बंधनकारक आहे. ही माहिती संबधीत संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांने डीजीटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत माहिती ‘ब्लॉक चेन’वर अपलोड न करणाऱ्या संघटना स्मार्ट कॉन्टॅक्टद्वारे स्वंयचलीतरित्या डिफॉल्टर यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या संघटनेची राहील.

खेळाडूच्या नोंदणी प्रक्रियेकरिता विशेष मोहीम

खेळाडूंनी आपल्या ‘क्रीडा ई प्रमाण’” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) आपल्या आधार संलग्न आयडीद्वारे लॉगीन करुन नोंदणी करणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी सादर केलेली माहिती आणी संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेला, हॅश यांची प्रणालीद्वारे स्वंयचलीत पडताळणी होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना यापुढे पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

अपिलीय तरतूद

तांत्रिक कारणास्तव एखाद्या खेळाडूचे प्रमाणपत्र नांमजूर झाल्यास तक्रार करण्याची व तक्रारी नंतरही खेळाडूस प्रमाणपत्र न मिळाल्यास ३० दिवसांच्या आत ऑनलाईनपद्धतीने अपील करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासन निर्णयान्वये जुनी कागदपत्रावर आधारीत पडताळणी प्रक्रिया बंद करुन पुर्णत: डिजीटल क्रीडा ई प्रमाणपत्र प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाच्या लाभ मिळण्याच्यादृष्टीने क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेनवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×