Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

आपुलकी कर्करोग रूग्णालयाचा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाणेरस्थित पुणे महानगरपालिका व आपुलकी हेल्थकेअर संस्थेच्या मेडिकलचे लोकार्पण

marathinews24.com

पुणे – कर्करोगाच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण विविध पातळीवर प्रयत्न करत आहोत. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी मेडिकल सेंटरच्या वतीने उभारण्यात आलेले हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. या मॉडेलच्या आधारावर भविष्यात असे अनेक रुग्णालयलये तयार करता येतील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. आपुलकी मेडिकल सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – सविस्तर बातमी

आपुलकी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्त्वावरील कॅन्सर व कार्डियाक संबंधीत अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असलेल्या बाणेर स्थित आपुलकी मेडिकल सेंटरचा रविवारी (१७ मे २६) रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपुलकी मेडिकल सेंटर मॉडेलच्या आधारावर भविष्यात असे अनेक रुग्णालयलये तयार करता येतील. मागील काही वर्षांत कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठीच्या उपचाराचा खर्चही मोठा असतो. या परिस्थितीत पीपीपी तत्वावर उभारण्यात आलेले हे रुग्णालयात मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. सीजीएसएचच्या माध्यमातून उपचार करण्याची तयारी दाखवली याबाबद्दल आपुलकी हेल्थ केअरचे आभार आहेत.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार भीमराव तारकीर, पुणे महानगपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम, पुणे महापालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेवक यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

त्याआधी कोनशिला अनावरणानंतर मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांनी आपुलकी मेडिकल सेंटर अत्याधुनिक सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. आपुलकी मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. प्रितेश मुनोत व व्यवस्थापकीय संचालक पियुष राका यांनी मान्यवरांना मेडिकल सेंटरव उपलब्ध आधुनिक सुविधांची माहिती दिली.

पुणे महानगरपालिकेसोबत अशा पथदर्शी प्रकल्पाची उभारणीत केलेल्या कामगिरीसाठी यावेळी महापालिका सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे व आपुलकी हेल्थकेअर लिमिटेडचे सुनील नहार, सचिन नहार व रवी जैन यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुणे व महाराष्ट्रभरातील नागरिकांना अत्याधुनिक- परवडणारी व जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाणेर स्थित हे अत्याधुनिक, १५० खाटांचे कर्करोग आणि हृदयरोग रुग्णालय प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या रूग्णालयातील सर्व क्लिनिकल सेवा सीजीएचएस (शासकीय दरानुसार) दरांवर दिल्या जाणार आहेत. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख आरोग्य सेवा योजनांची उपलब्धता असणार आहे. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी समावेशकता आणि प्रवेश योग्यता सुनिश्चित होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×