Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा; दीड कोटींचे दागिने लुटले

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

खानापूर परिसरातील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – खडकवासला-पानशेत रस्त्यावर असलेल्या खानापूर येथील एका सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा टाकून चोरट्यांनी १४४ तोळे सोन्याचे दागिने, २० हजारांची रोकड असा एक कोटी ४३ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच ते सहा दरोडेखोरांविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पाच ते सहा दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पुण्यात लुटखोर टोळ्यांची दहशत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत रस्त्यावर खानापूर येथे सराफी पेढी आहे. शुक्रवारी (२६ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर सराफी पेढीत शिरले. दरोडेखोरांनी त्यांचे चेहरे रुमालाने झाकले होते. दरोडेखोरांकडे कोयते. तलवारी होत्या. सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी ११४ तोळे सोन्याचे दागिने, गल्ल्यातील २० हजारांची रोकड असा एक कोटी ४३ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चाेपडे, उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी खानापूर परिसरातील ग्रामस्थांची चौकशी केली. दरोडा टाकल्यानंतर चोरटे दाट झाडीतून पसार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×