Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात लुटखोर टोळ्यांची दहशत

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

अपघाताच्या बतावणीने वाहन चालकांची लुटमार

marathinews24.com

पुणे – नागरिकांनो सावधान… तुम्ही जर रात्री -अपरात्री निमर्नुष्य ठिकाणांहून वाहन चालवत असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला टोळक्याकडून अडवून लुटमार केली जाउ शकतो. तुझ्याकडून अपघात झाला आहे, गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का, आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे, अशी बतावणी करीत शहरातील विविध भागात लुटमार करणार्‍या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यासोबतच रात्रपाळीला ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या कामाविषयी शंका निर्माण झाली आहे.

प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाचा खून; आरोपींना नांदेड येथून अटक – सविस्तर बातमी

रात्री-अपरात्री काम संपवून अथवा दुसर्‍या ठिकाणाहून वाहनांतून प्रवास करणार्‍यांना जिकरीचे बनले आहे. उपनगरातील रस्त्यांसह कमी वर्दळीच्या ठिकाणांवर टोळक्याकडून सावज हेरून लुटमार केली जात आहे. मागील महिन्याभरात पुण्यातील विविध भागात लुटमारीच्या घटनांमुळे वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास दुचाकी किंवा मोटारीतून प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रात्री उशिरा कामावरून सुटणार्‍या चाकरमान्यांनाही दुचाकीवर प्रवास करताना भीती बाळगावी लागत आहे. निमर्नुष्य ठिकाणे, कमी वर्दळीची जागा हेरून टोळक्याकडून वाहन चालकांचा पाठलाग केला जातो. त्यानंतर त्यांना दमदाटी करीत मारहाण करून रोकड, मोबाइल चोरी केला जात आहे.

गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का, अशी विचारणा करीत दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी तरूणाला अडवून ३९ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना ८ डिसेंबरला रात्री बाराच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्‍या तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तरूण ८ डिसेंबरला रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी दोघांनी तरूणाला इस्कॉन मंदीराजवळ अडवून गाडी चालवायला येत नाही का, असे विचारून ३९ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली आहे. दुसर्‍या घटनेत चोरट्यांनी अपघात झाल्याची बतावणी करुन मोटार चालकाला लुटल्याची घटना १४ डिसेंबरला सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात घडली. मोटारीतील चोरट्यांनी धमकावून तक्रारदार मोटार चालकाच्या गळ्यातील ३ लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच ट्रक चालकाकडून अपघात घडलेला नसतानाही त्याला अडवून मारहाण करीत ५ हजारांची लुट करणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २४ नोव्हेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर परिसरातील मगरपट्टा रस्त्यावर घडली आहे.

अपघाताच्या नावाखाली लुटमारीचा डाव

रात्रीच्या सुमारास प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांसह मोटार चालकांचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरटे लुटमार करीत आहेत. विशेषतः आम्हाला कट का मारला, तुला गाडी चालवता येत नाही का, तुझ्यामुळे अपघात झाला आहे, अशी बतावणी करीत लुटमार केली जात आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपनगर परिसरातून जाणार्‍या महामार्गालगत अशारितीने अवजड वाहन चालकांची लुट होत असल्याचे वारंवार घडणार्‍या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी हद्दीत अ‍ॅक्टीव्ह झालेल्या टोळक्यांचा बिमोड करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे

रात्रीच्या ड्युटीला अधिकाऱ्यांकडून अन्याय

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पोलीस पथकांची गोळाबेरीज केली जाते. अमुक-तमूक ठिकाणी चर्चेली जाणारी घटना घडल्यानंतर संबंधित पथकांचा वावर वाढतो. प्रत्यक्षात मात्र, वाहन लुटमार करणार्‍या टोळया पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोर्‍या करीत आहेत. तरीही स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके, रात्रपाळीला असलेली वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह एसीपी, डीसीपींची ड्युटीला मध्यरात्रीनंतर खरेच पेट्रोलिंगला न्याय देते का, असाही प्रश्न नागरिकांनी लुटमारींच्या घटनांमुळे विचारला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×