Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाचा खून; आरोपींना नांदेड येथून अटक

आंबेगाव पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – प्रेम संबंधाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना २२ डिसेंबरला आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली होती. घटनेनंतर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना नांदेड येथून अटक करण्यात आंबेगाव पोलिसांना यश आले आहे. संदीप रंगराव भुरके (वय २५) आणि ओमप्रसाद
उर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०, दोघे रा. चिखलवाडी, प्रफुलनगर, ता. भोकर, नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जावेद खादमियाँ पठाण (वय ३४) असे खून झालेल्याचे नाव आहे.

वाघोलीत गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद पठाण हे गायमुख चौक, आंबेगाव बुद्रुक येथील गुरुदत्त वॉशिंग सेंटरमध्ये कामाला होता. त्यावेळी आरोपी संदिप आणि त्याचा मित्र ओमप्रसाद तेथे आले. जावेद व आरोपीच्या बहिणीतील प्रेमसंबंधाचा राग मनात धरून दोघांनी जावेदसोबत हुज्जत घातली. त्याच्यावर लोखंडी हत्याराने डोक्यावर, हातावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत जावेदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जावेदचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी मूळ गाव भोकर, नांदेड येथे पसार झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नांदेडला रवाना करण्यात आले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी संदिप भुरके आणि ओमप्रसाद ऊर्फ दत्ता किरकन यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×