बनावट कागदपत्रे सादर करुन शस्त्र परवाना

बनावट कागदपत्रे सादर करुन शस्त्र परवाना

घायवळ टोळीतील गुंडासह दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळ याचा साथीदार अजय सरोदे यांनी बनावट कागदपत्रांद्वारे रहिवासी पुरावा, तसेच प्रतिज्ञापत्र सादर करुन पुणे पोलिसांकडून शस्त्र बाळगण्याचा (पिस्तूल) परवाना मिळविल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी सरोदे याच्यासह शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरोदेच्या घरात ४०० काडतुसे सापडली. त्यांपैकी २०० काडतुसे जिवंत आहेत. उर्वरित २०० काडतुसांचा वापर केला असून, पोलिसांनी रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना न्यायालयाने फटकारले – सविस्तर बातमी 

घायवळ टोळीतील गुंडांनी १७ सप्टेंबरला कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. या प्रकरणात सरोदे याला अटक करण्यात आली होती. तपासात सरोदे याच्याकडे शस्त्र परवाना असल्याचे उघडकीस आले होते. त्याने परवाना मिळवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. त्यासाठी त्याने येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याची बनावट कागदपत्रे सादर केली होती. सरोदे याला पुणे पोलिसांकडून २९ जानेवारी २०२४ रोजी शस्त्र परवाना देण्यात आला होता. सरोदे याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.

‘ पोलिसांचे पथक येरवडा परिसरात गेले. सराेदेने दिलेला पत्ता अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सरोदेने पोलिसांना दिली नव्हती. बनावट पत्ता, तसेच प्रतिज्ञापत्र सादर करुन दिशाभूल केल्याप्रकरणी सरोदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×