विरोधी पक्षनेते राहुल गांधींना न्यायालयाने फटकारले

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना न्यायालयाने फटकारले

न्यायालयाच्या समन्सवर टिप्पणी

marathinews24.com

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी समन्स जारी करणे, तसेच कामकाजावर शंका उपस्थित करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल यांना विशेष न्यायालयाने फटकारले आहे. लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वकव्य केले होते. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या वकिलांमार्फत मानहानी केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती.

भावासाठी पोलीस उपनिरीक्षक बनला मुन्नाभाई एमबीबीएस – सविस्तर बातमी 

सरतपासणीदरम्यान पुरावा म्हणून न्यायालयात सादर केलेली सीडी रिकामी असल्याचे आढळून आले. त्यानंतर सरतपासणीसाठी पुढील तारीख मागण्यात आली. गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी आक्षेप नोंदविला. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ अंतर्गत अर्ज करण्यात आला. ‘तक्रारदार सात्यकी सावरकर यांच्या वकिलांना सरतपासणी आणि पुरावा नोंदविण्यासाठी मुदतवाढ देऊ नये, तसेच तातडीने पुरावा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी’, अशी विनंती ॲड. पवार यांनी केली.

राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. पवार यांनी दाखल केलेल्या अर्जात ‘तक्रारदारांनी न्यायालयावर अनावश्यक दबाब टाकून राहुल गांधी यांच्याविरुद्ध समन्स जारी करण्याचा आदेश मिळवला आहे. तक्रारदार सावरकर यांनी कायदेशीर पुराव्याऐवजी मर्यादा ओलांडून समन्स मिळविले’, असे म्हटले होते.

अर्जातील वाक्यांवर सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी आक्षेप नोंदविला. गांधी यांच्या अर्जातील विधानामुळे न्यायालयाच्या निष्पक्ष कामकाजावर शंका निर्माण होत असल्याची तक्रार ॲड. कोल्हटकर यांनी न्यायालयाकडे केली. गांधी यांचे वकील ॲड. पवार यांनी याबाबत युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर गांधी यांच्या अर्जात न्यायालयाच्या कामकाजावर शंका उपस्थित करण्यात आल्याचे न्यायालायच्या निदर्शनास आले. त्यानंतर ‘न्यायालयाच्या समन्स आदेशाबाबत आक्षेप असल्यास त्यावर वरिष्ठ न्यायालयात आव्हान देता येईल. मात्र, त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. न्यायालयाच्या आदेशावर कोणतीही टिप्पणी करू नये,’ असे स्पष्ट आदेश विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×