दोन रिक्षासह दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – फिरण्यासाठी रिक्षासह दुचाकी चोरणार्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ रिक्षा, दुचाकी अशी वाहने जप्त केली आहेत. चेतन राजु जाधव ( वय २५ रा राजगड व्हिलाजवळ, आंबेगाव पठार) गणेश दत्तात्रय जगदाळे (वय २६ रा. धनकवडी, आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहेत.दरम्यान, वाहनचोरी रोखण्यासाठी हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी दिली आहे.
वाहनचोरी रोखण्याच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, किरण साबळे हे वाहन चोरांचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी चेतन राजु जाधव व गणेश दत्तात्रय जगदाळे यांनी वाहन चोरी केली असून, ते आंबेगाव पठार परिसरात थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेउ आरोपींना ताब्यात घेतले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, सचिन सरपाले, मंगेश पवार, महेश बारवकर, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.