Breking News
फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली, सव्वा लाखांची चोरीपुण्यात पीएमपीएल बसमध्ये बांगडी कटींग टोळीचा धुमाकूळसमाजाची सुरक्षितता हेच पोलिसांचे आद्यकर्तव्य – पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाभरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक, एकजण ठाररिक्षा पार्किंगच्या वादात रिक्षाचालकांनी केला वार…३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहनवाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनपुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटलेजिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभप्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

तब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्त

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्रीच्या ठिकाणी काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून अड्डा उध्वस्त  केला आहे. छाप्यात तब्बल ५३ कॅनसह एका बॅरलमध्ये भरुन ठेवलेली २ हजार ६५ लिटर गावठी हातभट्टी जप्त केली आहे. ४ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नवीन दिलीप बिनावत  (वय ५४   रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) असे अटक केलेल्याचे आरोपीचे नाव आहे.

अवैध धंदे करणार्‍याविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर काळेपडळ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून ठिकठिकाणी अवैध धंद्याची शोधमोहिम राबविण्यात आली. ११ जूनला तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सातवनगरात बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगजवळ एकजण दारूसाठा करुन विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तपास पथकाने सापळा रचून हातभट्टी अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. आरोपी नवीन दिलीप बिनावत याला ताब्यात घेतले.
त्याठिकाणाहून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले ५३ कॅनसह बॅरेलमध्ये भरुन ठेवलेली २ हजार ६५ लिटर हातभट्टी जप्त केली. आरोपीविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रविण कांबळे,   परशुराम पिसे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top