Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

पुण्यात ५० हजारांची लाच घेणारा सहायक पोलीस निरीक्षक अटकेत

पुण्यात ५० हजारांची लाच घेणारा सहायक पोलीस निरीक्षक अटकेत

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकाकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. पुणे-सोलापूर रस्त्यावरील मांजरी परिसरात मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५, रा. क्वीन टाॅवरशेजारी, महादेवनगर, मांजरी) असे लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

रिक्षा प्रवासात जेष्ठांच्या सोनसाखळींची हातसफाई – सविस्तर बातमी 

बाबर याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक कृष्णा बाबर याच्याकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी बाबर याने ५० हजार रुपये उच्च न्यायालयात तक्रारदाराच्या मुलाने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन प्रकरणात मदत करण्यासाठी दोन लाख रुपये अशी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने पहिल्या टप्यात ५० हजार रुपये देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ५० हजार रुपये घेऊन बाबरने तक्रारदाराला मांजरी परिसरात बोलावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा लावला. तक्रादाराकडून लाच घेताना बाबरला सापळा लावून पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर , पोलीस शिपाई भूषण ठाकूर, वैशाली माकर, दीपक काकडे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×