Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

रिक्षा प्रवासात जेष्ठांच्या सोनसाखळींची हातसफाई

रिक्षा प्रवासात जेष्ठांच्या सोनसाखळींची हातसफाई

टोळीला अटक, १५ लाखांचे दागिने जप्त

marathinews24.com

पुणे – रिक्षा प्रवासाचा दिखावा करीत जेष्ठ नागरिकांना टारगेट करणार्‍या टोळीचा समर्थ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रवासादरम्यान काही क्षणात शिताफीने जेष्ठांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले होते. पुन्हा चोरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी एकाला मालधक्का चौकात ताब्यात घेतल्यानंतर टोळी हाती लागली.त्यांच्याकडून १५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून संपवलं जीवन – सविस्तर बातमी 

टोळीने सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन सह पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली. शाकीर जाकीर तेली (वय २९ रा. संतोषनगर, कात्रज) मोसीन खान नुर खान (वय ३१ रा. जळगाव) इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख (वय ५० रा. जळगाव) गणेश उर्फ मेमरी (रा. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार जेष्ठ महिला १४ जूनला सकाळी साडेअकराच्या सुमारास पॉवर हाउस ते भवानी पेठ असा रिक्षा प्रवास करीत होती. त्यावेळी रिक्षातील चौघाजणांनी संगणमताने महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरुन नेली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषण केले असता, संबंधित गुन्हा जळगावमध्ये राहणार्‍या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांचा साथीदार संतोषनगर कात्रजमधील असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार समर्थ पोलिसांनी १ सप्टेंबरला शाकीर तेली याला अटक केली. चौकशीत त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली. संबंधित मोसीन खान आणि इस्माईल शेख अशाच प्रकारे चोरी करण्याच्या तयारीत असताना त्यांना मालधक्का चौकात पकडण्यात आले. ही कामगिरी उपायुक्त कृषीकेश रावले, एसीपी सचिन हिरे, वरिष्ठ निरीक्षक जयंत राजूरकर, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, एपीआय संदीप पाटील, संतोष पागार, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, गंगावणे, अविनाश दरवडे, चौधरी, यादव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×