सायबर चोरट्यांनी ३७ लाखांना टोपी घातली
marathinews24.com
पुणे – ७५ व्या वर्षी कमाईची हाव सुटली…संपत्ती कमविण्यासाठी पत्करलेला खुष्कीचा मार्ग अंगलट येउ शकतो, याचा अनुभव बिबवेवाडीतील एका ७५ वर्षीय जेष्ठाला आला आहे. सेवानिवृत्तीच्या काळातही शेअर ट्रेडींगमध्ये रक्कम गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकेल, या आशापोटी त्यांनी सायबर चोरट्यांवर भरोसा ठेवला. मात्र, तब्बल ३७ लाखांची गुंतवणूक करून घेत त्यांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना २४ मार्च २०२३ ते १० डिसेंबर २०२४ कालावधीत बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी मोबाइलधारक आरोपीविरूद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मस्तवाल पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून तपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७५ वर्षीय जेष्ठ नागरिक असून, २४ मार्च २०२३ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला होता. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानुसार साबयर चोरट्यांनी जेष्ठाचा विश्वास संपादित करून घेतला. जादा रक्कम कमविण्यासाठी जेष्ठानेही आयुष्यभराची कमावलेली संपत्ती गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. तब्बल ३६ लाख ६७ हजार रूपये वर्ग करूनही त्यांना सायबर चोरट्यांनी परतावा दिला नाही. त्यामुळे त्यांनी रक्कम पुन्हा मागितल्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करीत आहते.
शेअर ट्रेडींगची गुंतवणूक तरूणाच्या अंगलट, २५ लाखांचा गंडा
शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून साबयर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २५ लाख ३० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना एप्रिल ते २२ मे कालावधीत स्वारगेट परिसरातील मुकूंदनगरात घडली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरूणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण स्वारगेट परिसरातील मुकूंदनगरात राहायला असनू, एप्रिल महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत संपर्क साधला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास अवघ्या काही दिवसात जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांीन केली. त्यानुसार सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करून घेतले. त्यामध्ये अमूक-तमुक लाखांचा नफा झाल्याचे दाखवून तरूणाचा विश्वास संपादित केला. अवघ्या दीड महिन्यात तब्बल २५ लाख ३० हजारांची गुंतवणूक करून घेतली. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विकास भारमळ तपास करीत आहेत.