Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मस्तवाल पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून थंड हालचाली

तळजाई मैदानावर विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण

marathinews24.com

पुणे – मस्तवाल पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून थंड हालचाली – पोलीस भरतीची तयारी करणार्‍या तरुण- तरुणींना धक्काबुक्की करत दगडाने हल्ला केल्याप्रकरणी पैलवानांसह ७ जणांवर सहकारनगर पोलिस ठाण्याअंतर्गत खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तळजाई येथील मैदानावर घडली होती. याप्रकरणी गुुन्हा दाखल होताच आरोपी पैलवार पसार झाले असून, दोन दिवसानंतरही आरोपींचा माग घेण्यात सहकारनगर पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता पुणे फिटनेस अ‍ॅकेडमीविरूद्ध गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकाविले; दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस सुरूच – सविस्तर बातमी

ओंकार दगडे, अमर साबळे, माऊली कोकाटे, चैतन्य तोरसकर, निलेश केदारी, हर्षवर्धन सावंत, तौशिफ, पाञुट यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. विकास नाना मेटकरी (वय ३२, धंदा नोकरी, रा. अरुणोदय सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम १०९, ११५(२), १३१, ३५१(२), ३५२, १८९(२), ३२४(४), ७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मेटकरी मंगळवारी (दि.१५) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पुणे फिटनेस अकॅडमी मुले मुलींसह तळजाई ग्राउंडवर धावण्याचा सराव करीत होते. त्यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरुन आरोपी पैलवान ओंकार दगडे, अमर साबळे, माऊली कोकाटे, चैतन्य तोरसकर, निलेश केदारी, हर्षवर्धन सावंत, तौशिफ, पाञुट व इतरांनी मेटकरी व त्यांचा मित्र रविंद्र चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहाण केली. मेटकरी यांच्या डाव्या डोळयाला व चेह-याला दुखापत झाली. तेव्हा त्याच्यापैकी आरोपीने बाजूला पडलेला दगड दोन्ही हातामध्ये उचलला. त्यानंतर याला आज जिवे ठारच मारतो असे म्हणुन मेटकरी यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.

पुणे फिटनेस अकॅडमी मधील मुली मारहाण होत असलेल्यांना सोडविण्यास गेल्या असता त्यांना आरोपींपैकी एकाने त्यांनाही अश्लील शिवीगाळ केली. घटनेप्रकरणी १५ जुलैला गुन्हा दाखल झाला असून, आरोपी पैलवान मोबाइल बंद करून पसार झाले आहेत. त्यांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, दोन दिवसानंतरही आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.

पैलवानाकडून मारहाणीची तक्रार, पुणे फिटनेस अ‍ॅकेडमीविरूद्ध गुन्हा

तळजाई मैदानावर व्यायाम करताना पैलवान आणि पुणे फिटनेस अ‍ॅकेडमीतील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी आता पैलवान अमर साबळे (वय २२ रा. वडगाव बुद्रूक) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विकास मटकरी, मुजीम पठाण यांच्यासह अ‍ॅकेडमीतील विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. छातीवर बसून पाच-सहा वेळा मारल्याची तक्रार साबळेने दिली आहे. मुलांच्या मारहाणीत हाताला जखम झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×