Breking News
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभजैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला एटीएसने केली अटक

जहाल माओवादी प्रशांत कांबळे एटीएसच्या जाळ्यात

marathinews24.com

पुणे – संगणकासह लॅपटॉप दुरुस्ती करणाऱ्या पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी जहाल माओवादी प्रशांत कांबळे याला एटीएसने ठाण्यातून अटक केली आहे. कबीर कला मंचच्या संपर्कात आल्यानंतर तो १५ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईला कामानिमित्त जातो असे सांगून तो घरातून निघून गेला. मात्र परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबाने १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती.

पुण्यातील रिक्षा चालकाचे विकृती, गुगल पे नंबरवर तरुणीला केला फोन – सविस्तर बातमी

एटीएसने २०११ दरम्यान संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला ठाण्यातून अटक केली होती. तिचे पुण्यात सक्रिय असणारे सहकारी आणि कबीर कला मंचचे काही कलाकारही नक्षलवादाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधित संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चे सक्रिय सदस्य असल्याचा आरोपाखाली UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, पुण्यातून मिसिंग झालेला प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोघे गडचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यांनाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आले. दोघे सर्वोच माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे सोबत काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मिलिंद तेलतुंबडेलाही गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी करण्यात आहे. मिलिंद नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. संतोष शेलार आजारी असताना जानेवारी २०२४ मध्ये पुण्यात घरी आला असताना एटीएसने त्याला अटक केली होती.

आता पुणे एटीएसने प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला अटक करून ठाणे युनिटच्या ताब्यात दिले. ठाणे न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. संगणक दुरुस्ती कौशल्यामुळे त्याला नक्षलवादी चळवळीत “लॅपटॉप” नाव देण्यात आले होते. जंगल तसेच शहरी भागात त्याच्या नक्षलवादी कामाबाबत पुढील तपास सुरु आहे. दरम्यान या गुन्ह्यातील अँजेलासह इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत. तर २०२० मध्ये कबीर कला मंचचे तीन कलाकार याना एनआयएने एल्गार परिषद – कोरेगाव भीमा केसमध्ये प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top