Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

प्रवाशांकडून ५ लाखांच्या खंडणीची प्रयत्न; महामार्ग वाहतूक पोलिसांसह ५ जण अटकेत

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – वाहन तपासणीच्या नावाखाली चार प्रवाशांना अडवून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुणे–मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर घडली आहे. याप्रकरणी महामार्ग वाहतूक पोलिसांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पाच जणांना अटक केली असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

दुचाकी लावण्याच्या वादातून दाम्पत्याला गजाने मारहाण – सविस्तर बातमी

पोलीस नाईक (चालक) अमोल वायकर (बकल क्र. 398) पोलीस शिपाई अमोल नन्नावरे (बकल क्र. 2901) पोलीस शिपाई तुषार धावरे (बकल क्र. 3014) वॉर्डन किसान बॉम्बले, नितेश चव्हाण आणि तुषार घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तक्रारदार भूषित उमेश शर्मा हे 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तीन मित्रांसह कारमधून पुण्यावरून लोणावळ्याकडे जात होते. मावळ तालुक्यातील ताजे गावाच्या हद्दीत त्यांच्या वाहनाला अंबर दिवा लावलेल्या वाहनातून आलेल्या सहा जणांनी अडवले. हे सर्व जण महामार्ग वाहतूक पोलिसांच्या गणवेशात होते.

आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या मित्रांकडे अमली पदार्थ असल्याचा खोटा आरोप करत कारवाईची धमकी दिली. त्यानंतर कारवाई टाळायची असल्यास ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. तसेच पैसे काढण्यासाठी त्यांना तळेगाव येथे एटीएममध्ये जाण्यास भाग पाडले.
तळेगाव येथे तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपींच्या लक्षात येताच ते तेथून पसार झाले.

याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आला आहे. तपासादरम्यान सर्व सहा आरोपी हे खंडाळा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×