Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

तरुणाचा खुनाचा प्रयत्न- फरार गुंड अटकेत

मोहजालात अडकवून खंडणी उकळणारे दाम्पत्य गजाआड

पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून एकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. विशाल बाळासाहेब कांबळे (वय २७, रा. धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या सरइताचे नाव आहे. धनकवडीत २५ ऑक्टोबर रोजी वैमनस्यातून एका तरुणावर कांबळेने कोयत्याने वार केले होते. या घटनेत तरुण जखमी झाला होता.

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान, ६ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

कांबळे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. तो लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल पवार आणिअभिमान बागलाने यांना मिळाली. पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रुपेश जाधव, उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, बापू खुटवड, हवालदार अमोल पवार, निलेश शिवतरे, अभिमान बागलाने, महेश भगत, किरण कांबळे, सागर सुतकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×