पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान, ६ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान, ६ जणांविरुद्ध गुन्हा

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या सहा जणांना पकडले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले. नगर रस्त्यावरील केसनंद भागात असलेल्या एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. या प्रकरणी मोहम्मद एहसान नजर (वय २०), अर्षद रोशन अली (वय २२), अखिलेश बिजूकुमार प्रसाद (वय २०), दिलीप सक्रु चव्हाण (वय ३६), प्रेमदास रामचंद्र राठोड (वय ३०), अश्विनी प्रेमदास राठोड (वय २७) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी बांधकाम मजूर आहेत. ते सध्या केसनंद भागातील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहायला आहेत. पोलीस हवालदार बाळासाहेब हराळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लष्कर भागात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मतदान शनिवारी (७ फेब्रुवारी) पार पडले. केसनंद भागातील श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या आवारातील मतदान केंद्रात तीन आरोपींनी मतदान केले. तीन जणांची मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. पोलिसंनी सहा जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तीन आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. उर्वरित तीन आरोपी वाशीम जिल्ह्यातील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×