वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न, चौघांविरुद्ध गुन्हा

मामा नव्हे कंसमामा, भाच्याचा केला खून

हडपसरमधील म्हाडा वसाहत परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना हडपसरमधील म्हाडा वसाहत परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रामचंद्र तानाजी कांबळे (वय ४०, रा. संगम सोसायटी, जुनी म्हाडा काॅलनी, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. सोनू कांबळे, वैभव कांबळे, राहुल कांबळे, अजय पांडुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कांबळे याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात दोन ठिकाणी टोळक्याकडून वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र कांबळे रविवारी (३१ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास म्हाडा काॅलनी परिसरातील लहूजी वस्ताद व्यायामशाळेजवळ मित्रांबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपींनी कांबळे याला गाठले. त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन कोयत्याने वार केले. या घटनेत कांबळे गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक महाडिक तपास करत आहेत.

रामटेकडीत टोळक्याची दहशत

हडपसरमधील रामटेकडी परिसरात रविवारी रात्री दहशत माजवून एकाला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी महेश शिंदे, चेतन बावरी, विनायक खेंगरे यांच्यासह पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धीरज बळीराम शिंदे (वय ४३, रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रामटेकडी परिसरात थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. ‘माझ्या चुलतभावाला तू काय सांगितले ?’, अशी विचारणा करुन टोळक्याने दहशत माजविली. शिंदे याला बेदम मारहाण केली, तसेच त्याला दगड फेकून मारला. जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. टोळक्याने दहशत माजविल्याने या भागात गणपती मंडळाचा देखावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट उडाली. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.

मोबाइल विक्री दुकानात चोरी

मोबाइल विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी लॅपटाॅप आणि जुने मोबाइल संच असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना लोणीकंद परिसरात घडली.

याबाबत सतीस भाऊ डुबे (वय २५, रा. अष्टापूर फाटा, राहू, ता. दौंड ) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चाेरट्यंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डुबे यांचे अष्टापूर फाटा परिसरात मोबाइल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी २८ ऑगस्ट रोजी मोबाइल दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. जुने माोबाइल, लॅपटाॅप असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×