Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

हातउसने पैशांच्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शनिवारवाड्याजवळील भुयारी मार्गात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. नागार्जुन कोंडा रेड्डी (वय २५) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी छोटे उर्फ सूरज वर्मा (वय २४ ) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेड्डी याची पत्नी रिना (रा. शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ) हिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी तरुणीचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वर्मा हा कचरा वेचक आहे. रेड्डी याने त्याला हातउसने पैसे दिले होते. हातउसने पैसे परत मागण्यावरुन त्यांच्यात वाद झाले होते. ७ मे रोजी शनिवारवाड्याजवळ असलेल्या भुयारी मार्गात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास रेड्डी आणि वर्मा यांच्यात वाद झाले. वादातून यादव आणि त्याच्याबरोबर असलेल्या एकाने रेड्डी याला मारहाण केली. त्याच्यावर कटरने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील रेड्डी याला ससून रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील तपास करत आहेत.

लष्कर भागात चार दुकानांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न

पुणे-शहरात लष्कर भागात चार दुकानांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.याबाबत चुनाराम गोकुळराम चौधरी (वय ३१, रा. न्यू माेदीखाना, लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील चौधरी यांचे दुकान आहे. चोरट्यांनी शुक्रवारी (८ मे) चौधरी यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला, तसेच सेंटर स्ट्रीट परिसरातील गुडलक फूटवेअर शाॅप, कोळसे गल्लीतील न्यू रिफ्लेक्शन्स फोटो फ्रेम, वँडरलँड शाॅप या दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ओैषध विक्री, किराणा माल विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×