प्राधिकृत अधिकारी जेष्ठ महिलेला शिवीगाळ

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

आरोपींकडून रस्त्यात सिलिंडर मांडून पदार्थांची विक्री

marathinews24.com

पुणे – प्राधिकृत महिला अधिकार्‍याने केलेल्या कारवाईमुळे त्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. फास्टफुड विक्रीसाठी रस्त्यातच सिलिंडर ठेऊन सोसायटीधारकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ एप्रिल ते सप्टेंबर २०२५ कालावधीत घडली.

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार – सविस्तर बातमी

इर्षाद अन्वरूल हसन उर्फ शबीर, पुनाराम भिकारामजी परमार, समाराम पुनाराम परमार, सुरज प्रजापत व ते चालवत असलेली विनापरवाना फास्ट फुड आस्थापना खाना खजाना यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ७६ वर्षीय जेष्ठ महिलेनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला उपनिबंधक कार्यालर्याकडून प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तक्रारदार महिला राहत असलेल्या सोसायटीतच इर्षाद कमीटीमध्ये बेकायदेशिररित्या पद भूषवत होता. तक्रारदार महिलेने उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्याला कमिटीतून बडतर्फ केले. त्याचा राग मनात धरून त्याने सोसायटीचा वेगळा गु्रप बनवला. त्या गु्रपवपर तक्रारदार महिलेविषयी बदनामीकारक बोलत असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान ८ ऑगस्टला परमान नावाचा आरोपी सोसायटीच्या कार्यालयात आला. त्याने आमच्या फ्लॅटमध्ये पाणी येत नसल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी तक्रारदारांनी त्यांना सर्वांना पाणी येते, नळ तपासून घेण्यास सांगितले.

परमारने भाडेतत्वावर दुकान फास्टफुडवाल्यांना दिले आहे. ते दुकानाच्या बाहेर कॉमन जागेत अवैधिरित्या सिलिंड लवून पदार्थ बनवितात. सोसायटीत भविष्यात आगीसारखा प्रकार घडू शकतो. यामुळे सोसायटीच्या कार्यकारणीस जबाबदार धरले जाऊ शकते म्हणून तुम्ही पालिका, पोलिस आणि अग्निशमन दलाचे नो ऑब्जेक्शन सोसायटीत जमा करावे अशी विनंती तक्रारदार महिलेनेकेली. याचा राग अनावर झाल्याने परमारने महिलेला अश्लिल हाभ भाव करून शिवीगाळ केली. तसेच महिलेविरोधात लोकांना चिथावणी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×