Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

बारामती नगरपरिषदेकडून १४ ठिकाणी व्यवस्था – मुख्याधिकारी पंकज भुसे

बारामती नगरपरिषदेकडून १४ ठिकाणी व्यवस्था - मुख्याधिकारी पंकज भुसे

अतिवृष्टीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नागरिकांची जेवणासह पिण्याच्या पाण्याची अनेक ठिकाणी व्यवस्था

marathinews24.com

बारामती – अतिवृष्टीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेलेले होते, अशा आपद्ग्रस्थ नागरिकांसाठी नगरपरिषदेमार्फत १४ ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पंकज भुसे यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी – सविस्तर बातमी 

बारामती नगरपरिषदेकडून १४ ठिकाणी व्यवस्था - मुख्याधिकारी पंकज भुसे

नगरपरिषदेमार्फत जळोची, तांदुळवाडी, रुई, कल्याणी नगर, कसबा- पतंगशाहनगर-शारदा प्रांगण येथील नगरपरिषद शाळा, शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा, पंचशीलनगर समाज मंदिर या ठिकाणी राहण्याची सोय केली होती. प्रत्येक ठिकाणी नगरपरिषदेचे ३ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. या ठिकाणी जवळपास २०० नागरिकांची राहण्याची तसेच शहरातील एकूण ६५० नागरिकांची जेवणासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, याकामी शहरातील नागरिक व विविध पदाधिकाऱ्यांचे देखील वेळोवेळी सहकार्य मिळाले आहे.

अतिवृष्टी झाल्यामुळे प्रामुख्याने जळोची ओढ्यालगतच्या घरांना फटका बसला असून शहरात एकूण ७० घरांमध्ये पाणी शिरले असून असून २५ घरांची अंशतः पडझड झालेली आहे. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने जळोची येथील ओढ्यात वाहून जाणारा एक इसम व काटेवाडी येथील एका कुटुंबातील ७ नागरिकांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले.

शहरातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बारामती नगरपरिषदेच्या ८५५४९ २२४९४ या व्हाट्सॲप क्रमांकावर अथवा ०२११२-२२२३०७/२२२४९४ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही भुसे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×