Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

Beed Pune Express Train : चार दशकाच्या झुक… झुकला हिरवा झेंडा

Beed Pune Express Train

बीड ते पुणे एक्सप्रेसचा शुभारंभ; बीडला दक्षिण भारताशी जोडणार -सुनेत्राताई पवार

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्याची निवडणूक कुठली ही असो मागील चार दशकाच्या कालखंडात निवडणूक प्रचारामध्ये बीडच्या रेल्वेचा प्रश्न आलाच समजा, लोकसभेच्या ८-१० विधानसभेच्या १०-११ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणूका सत्ताधारी विरोधक कोणीही असो त्या निवडणूका याच विषया भोवती घोंगावत रहायच्या. Beed Pune Express Train अखेर चार दशकात स्व. खा. केशरकाकू, स्व. गोपीनाथराव मुंडे ते स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार, स्व.अमोल गलधर , माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. प्रितम मुंडे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार त्याच बरोबर विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रयताने अखेर नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग पुर्णत्वास नेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह  सविस्तर बातमी 

आज पासून सुपरफास्ट पुणे-बीड Beed Pune Express Train या रेल्वेला सुनेत्राताई पवारांच्या उपस्थितीत मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला आणि बीडकरांचे ४० वर्षाचे स्वप्न साकार झाले. बीडकरांची ४० वर्षाची स्वप्नपुर्तीला अधिकृत स्वरूप देण्याहेतू रेल्वे स्टेशन या ठिकाणी आज महत्वपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह खा. बजरंग सोनवणे, आ.प्रकाश सोळंके, आ. विजयसिंह पंडित, मध्य रेल्वेचे मुख्य अधिकारी राजेशकुमार, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता बी के सिंह, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सीईओ जितीन रहमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, माजी आ, भिमराव धोंडे हे उपस्थित होते.

पुणे-बीड रेल्वेला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधतांना सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, आजचा दिवस बीडकरांसाठी अत्यंत भाग्याचा आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी रेल्वे आली होती, स्व. अजितदादांनी बीडकरांच्या रेल्वेचे स्वप्न पाहितलं होतं आज त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्ण होत आहे. Beed Pune Express Train बीडला रेल्वे आल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. उद्योगांमध्ये वाढ होणार, बीड – पुणे या साठी प्रवास करण्यास सोपा पर्याय झाला.

केंद्राच्या आणि राज्याच्या सहकार्यामुळे हे सगळं होवू शकलं. गेल्या १७ सप्टेंबरला स्व. अजितदादांनी पुढच्या १७ सप्टेंबरला म्हणजे आज बीड येथून पुण्यापर्यंत आपल्याला रेल्वेने प्रवासा करायचा आहे असा शब्द बीडकरांना दिला होता. दादांच्या शब्दाची परिपुर्ती माझ्या हातून हात आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात प्रामुख्याने हैद्राबाद वरून परळीला रेल्वे ही औष्णिक विद्युत केंद्राला कोळसा पुरवण्यासाठी झाली होती. त्यानंतर परळीच्या रेल्वे मार्गावर प्रवाशी वाहतूक ही सुरू झाली होती. मात्र खऱ्या अर्थाने आज सर्वच प्रगतीसाठी आज सुरू झालेली बीड – पुणे रेल्वे ही विकासाचा भगीरथ ठरणार आहे असेही यावेळी ताईंनी सांगितले.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरीव सहकार्य केले. या रेल्वे मार्गाची १९९० च्या दशकापासून रेल्वे चर्चा होत आलेली आहे. तेव्हा पासून ते आज पर्यंत बीडच्या रेल्वेसाठी अनेकांनी योगदान दिले. परळी- बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग दक्षिण भारताशी जोडला जाईल अशी ग्वाही देखिल त्यांनी यावेळी दिली आहे.

२० सप्टेंबरपासून नियमित रेल्वे

ऑनलाईन बुकींग २८ सप्टेंबरपासून बीड येथून पुण्यासाठी प्रत्येक दिवशी नियमितपणे रात्री ९.३० वा. रेल्वे सुरू राहणार असून पुणे येथून बीडकडे १०.४५ वा. रेल्वे सुरू होणार आहे तर ऑनलाईन सह तिकिट आरक्षणाची बीड रेल्वे स्थानकावर सुविधा २८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

त्या ज्ञात-अज्ञातांना विसरता येणार नाही

मागील ४० वर्षाच्या कालखंडामध्ये नगर-बीड- परळी रेल्वेसाठी बीड जिल्यात अनेक आंदोलने झाली. अबालवृध्द रस्त्यावर उतरली, कित्येक तरूणांना जेलची वारी करावी लागली. मोठ मोठे आंदोलन करतांना आंदोलक थेट आकाशवाणीमध्ये घुसले, केंद्र सरकारला घाम फुटेपर्यंत स्वातंत्र्य सैनिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत बीडकर आंदोलनात उतरले. त्या सर्व ज्ञात-अज्ञात आंदोलकांच्या मागणीला आज खरे यश मिळाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×