Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

वाजत-गाजत निघणार बाप्पाची आगमन मिरवणूक

marathinews24.com

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. १४) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची जंगी आगमन मिरवणूक देखील निघणार आहे.

पुणे फेस्टिव्हल”च्या बोधचिन्हाची भव्य रांगोळी – सविस्तर बातमी 

मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर उत्सव मंडपातून सव्वा आठ वाजता श्रींची आगमन मिरवणूक सुरू होईल. या मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्र गर्जना, केशव शंखनाद ही ढोल पथके या प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीत वादन करणार आहेत. याशिवाय आढावा बंधू यांचा नगरखाना आणि मर्दानी खेळ ही मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत.

सकाळी सव्वा आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. भवनापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौकात आणि तेथून तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता मार्ग या मिरवणुकीचे आगमन गणेश सुवर्णधाम या सजावट मंदिरात होणार आहे. त्यानंतर साडे बारा वाजता जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहावे, ही विनंती!

– पुनीत बालन (उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×