बाणेर भागातील घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव स्कुल बसने ट्रॅक्टरच्या ट्रॅलीला धडक दिल्यानंतर ट्रॅली पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार व्यक्तीचा ती ट्रॅली अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बाणेरमधील मर्लिन व्हेंटाना साईटजवळ घडली. बस चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाजी उत्तमराव शिंदे (वय ५३, रा. सायकर मळा, बाणेर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात स्कुल बसवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजी यांचा मुलगा गजानन यांनी तक्रार दिली आहे. हा अपघात बुधवारी दुपारी पावणे पाचच्या सुमारास घडला आहे.
प्रेम संबंधावरून तरुणीला त्रास; विरोध करणाऱ्या मामाचा खून – सविस्तर बातमी
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजी शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून ननावरे ब्रिजवरून राधा चौक बाणेर याठिकाणी जात होते. तेव्हा शेजारून एक ट्रॅक्टर जात होता. तर, त्या ट्रॅक्टरच्या पाठिमागून एक स्कूल भस जात होती. स्कूल बसचा वेग जास्त होता. मुले घेऊन ही बस मुलांना सोडण्यास जात होती. दरम्यान, मर्लिन व्हेंटाना साईटजवळ अचानक स्कुल बसने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठिमागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर ट्रॉली पलटी झाली आणि शेजारून दुचाकीवर चाललेल्या शिवाजी शिंदे यांच्या अंगावर पडली. यात गंभीर मार लागल्याने शिंदे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्कूल बस चालक पसार झाला. अधिक तपास बाणेर पोलिस करत आहेत.
























