Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

बस चालकाविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुषार दत्तात्रय लोंढे (वय २२, रा. आनंदनगर, वाघाेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत साई हरिभाऊ लोंढे (वय २१, रा. आनंदनगर, वाघोली) याने फिर्याद दिली आहे.

फसवणूकग्रस्तांना न्याय द्या; अन्यथा विधान भवनावर विराट मोर्चा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तुषार लोंढे हा गुरुवारी (२६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाला होता. वाघोली परिसरात भरधाव प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने दुचाकीस्वार तुषारला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुषारला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पसार झालेल्या बस चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत. नगर रस्ता भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार, तसेच पादचारी मृ्त्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. बहुतांश अपघात बस चालकांच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×